सावत्रबापाकडून तीन वर्षाच्या चिमुरडीचा गळा आवळून खून

रावेर : सावत्र बापाने तीन वर्षाच्या चिमुरडीचा गळा आवळून निघुण खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रावेर येथे घडली. दरम्यान, चिमुरडीच्या जन्मदात्या आईने पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुक्ताई नगरातील बेलसवाडी येथील भारत मसाने याच्यासोबत माधुरी यांचा सन २०१७ मध्ये विवाह झाला होता. त्यांना पहिल्या पतीपासून पाच वर्षाचा मुलगा पियुष व तीन वर्षाची मुलगी आकांक्षा ही चिमुरडी आहे. मात्र पतीशी पटत नसल्याने माधुरी दोन्ही मुलासह बेलासवाडी येथे राहत होती. त्यानंतर माधुरीने रावेर येथील अजय घेटे याच्याशी काही दिवसापूर्वी लग्न केले होते. तेव्हापासून ही दोन्ही मुले रावेर येथे सावत्रबाप अजयकडे राहत होती. दि. ३१ मे रोजी अजयने तीन वर्षाची सावत्र मुलगी आकांक्षा हिला दांडक्याने मारले आणि गळा आवळून त्याचा खून केला. ही घटना अजयची पत्नी माधुरी हीला माहित असताना तिने पुरावा नष्ट करण्याच्या व मृतदेहची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने मुलीचा मृतदेह पतीपत्नीने माहेरी बेलसवाडी येथे नेला.

रावेर पोलिसांनी चिमुकलीची आई माधुरी घेटे व सावत्र बाप अजय घेटे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान खूनाचे कारण समजू शकले नसून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आशिषकुमार अडसूळ तपास करीत आहेत.