भुसावळ – आजही देशाला लोकसंख्येचा विस्फोट,धर्मांतरण, गोहत्या, लव्ह जिहाद, भ्रष्टाचार वगैरे वगैरे समस्यांनी ग्रासलेले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षे होताहेत तरी सुद्धा समान नागरी कायदा अजूनही अस्तित्वात आलेला नाही, हे सर्व करण्यासाठी विद्यमान पक्ष सत्ताधारी असूनही सक्रिय दिसत नाही देश सुदृढ बनविणे व हिंदुत्व रक्षणासाठी आज देशात हिंदू महासभेची आवश्यकता आहे असे हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष मुन्ना कुमार शर्मा यांनी महाराष्ट्र प्रदेश हिंदुसभेची कार्यकारिणीची पत्रकार परिषदेत प्रतिपादन केले .

महाराष्ट्र प्रदेश हिंदुसभेची कार्यकारिणीची पत्रकार परिषदेचे आयोजन आज दिनांक २ जुन रविवार रोजी दि वर्ल्ड स्कूल भुसावळ येथे करण्यात आले होते यावेळी शर्मा जी बोलत होते . महाराष्ट्र प्रदेश हिंदू महासभेची पत्रकार परिषदेस दिल्लीहून अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष मुन्ना कुमार शर्मा, महाराष्ट्र प्रदेश हिंदू महासभेचे अध्यक्ष अनिल पवार, उपाध्यक्ष निशिकांत कोलते, प्रदेश संघटन मंत्री धनसिंह सूर्यवंशी, प्रधान कार्यवाहक चंद्रहास फेरन, कोल्हापूर येथून लोकसभेसाठी उभारलेले हिंदू महासभेचे शशिभूषण देसाई हे सर्व उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलन, सरस्वती पूजन, भारत माता पूजन, श्रीशिवछत्रपती व सावरकरांच्या प्रतिमापूजनाने झाली .
यावेळी मार्गदर्शन करतांना राष्ट्रीय अध्यक्षांनी अखिल भारतीय हिंदू महासभेचा इतिहास आणि तिची आज आवश्यकता काय आहे या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच अन्याय सहन करणार नसून अन्यायाविरुद्ध एकजूट होऊन देश रक्षण करु असेही सांगितले . .या पत्रकार परिषदेला आणि बैठकीला बार्शी, जालना, भुसावळ, सोलापूर, पंढरपूर, धाराशिव, अकोला, नागपूर, सांगली, मुंबई या विविध ठिकाणाहून हिंदू महासभेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


