मुक्ताईनगर तालुक्यात भरधाव डंपरने तरुणाचा चिरडले -खामखेडा येथील पूर्णा नदीपात्रातील घटना

मुक्ताईनगर – तालुक्यातील खामखेडा येथील पुर्णा नदीपात्रातून गाळ वाहून नेणार्‍या डंपरने एकाला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दि. २९ मे रोजी सकाळी घडली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्याचे काम सुरु होते.

संदीप जोंधळे (वय ३० रा. संगमनेर जि. अहमदनगर) असे मयत इसमाचे नाव आहे. खामखेडा येथील पुर्णा नदीच्या पात्रातून शेकडो ट्रॅक्टर, टिप्पर ,हायवा यांच्या साह्याने मोठ्या प्रमाणात गाळाचा उपसा केला जात आहे. बुधवारी सकाळी नदी पात्रातून गाळ घेऊन मुक्ताईनगरकडे भरधाव वेगाने निघालेल्या डंपरने आज गुरुवारी नदी पात्राच्या जवळच एका व्यक्तीला चिरडले. यात त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. मुक्ताईनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.