जळगाव – जळगाव शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक आणि उद्योजक राजा मयूर यांच्या घरातील नोकराने भावाला मुलगा झाल्याचे सांगत राजा मयूर यांच्यासह दोन सुरक्षा रक्षकांना गुंगीचे सरबत पाजून ते बेशुद्ध झाल्यानंतर इतर चार साथीदारांच्या मदतीने घरातील लाखोरो रुपयांचे दागिने आणि रोकड चोरून पोबारा केल्याची घटना आज पाहाते २ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे . घटनेची माहिती कळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेत तापास सुरु केला आहे. दरम्यान गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याने किती रुपयांचा मुद्देमाल गेला हे कळणार आहे.

याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, शहरातील दूध फेडरेशन परिसरात राजा ट्रॅक्टरचे मालक राजेंद्र अनिल मयूर उर्फ राजा मयूर वय ८४ हे आपल्या पत्नीसह या ठिकाणी राह्यला असून त्यांच्या बंगल्यावर विकास नेपाळी नावाचा नोकर कामाला आहे. घराच्या बाजूलाच तो एका खोलीत राहत होता. या बंगल्यात दोन सुरक्षारक्षक रात्री सुरक्षा देण्यासाठी कामाला आहेत.
गुरुवारी ३० मे रोजी रात्री १०.३० वाजता विकास नेपाळी याने भावाला मुलगा झाला असे सांगून सुरक्षारक्षक वसंत श्रीखंडे व उदय समेळ यांना गुंगीचे औषध असलेले सरबतपाजून राजा मयूर यांना देखील पाजले. त्यामुळे दोनही सुरक्षारक्षक आणि राजा मयूर हे बेशुद्ध झाले. राजा मयूर यांची पत्नी शैला मयूर यांना बाथरूममध्ये बंद करून त्यांना धमकी दिली.यानंतर नेपाळी याने पहाटे दोन वाजता चार जणांना बोलावून मुख्य खोली उघडून घरातील सामान अस्ताव्यस्त करून घरातील मौल्यवान वस्तू व सोन्याचे दागिने असा मुद्देमाल चोरून नेला
मॉर्निंग वॉकिंगसाठी नियमितपणे सकाळी ७ वाजता राजा मयूर हे जैन हिल्स येथे जात असल्याने त्यांच्या वाहनावरील चालक कांतीलाल टाक यांनी राजा मयूर घेण्यास आला असता त्याने संपर्क केला . मात्र कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी भाऊ भरत मयूर यांना फोन करून ते फोन उचलत नसल्याचे सांगितले. त्यानुसार भारत मयूर हे राजा मयूर यांच्या घरी आले असता, हा सर्व प्रकार लक्षात आला .बेशुद्धावस्थेत पडलेले सुरक्षारक्षक आणि राजा मयूर यांना उठवून पाणी पाजले. भेदरलेल्या अवस्थेत असलेल्या शैला मयूर यांना देखील धीर दिला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तसेच विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित व पथक घटनांसाठी दाखल झाले. शहर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून पुढील चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.


