भुसावळच्या म्युनिसिपल हायस्कूल मध्ये दहावीच्या परीक्षेत स्वाती सोनवणे प्रथम : शाळेचा निकाल 84.81 टक्के :

भुसावळ प्रतिनिधी – भुसावळ नगर परिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ शाळेचा निकाल 84.81 टक्के लागला असून शाळेतून स्वाती संतोष सोनवणे हिने 85.40 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर गायत्री शिवाजी मतलाने व प्रतिभा अशोक पारधे यांनी 75.60 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला.तर आदित्य प्रभाकर माळी याने 72.60 टक्के गुण मिळवून शाळेतून तिसरा क्रमांक मिळवला . एसएससी बोर्डाच्या परीक्षेत एकूण 79 बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी 67 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सर्व प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे व सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी विद्यार्थ्यांचे नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी जितेंद्र पाटील, मुख्याधिकारी महेश वाघमोडे, मुख्याध्यापक ललित फिरके, बिल्डिंग कंडक्टर ज्येष्ठ शिक्षिका सरला सावकारे, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे.