वरणगाव राष्ट्रीय संत शिरोमणी भिमा भोई यांची जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येऊन शालेय विद्यार्थ्याचां गुणगौरव सोहळा संपन्न झाला

शहरातील रामपेठ परिसरातील भागात संत भिमा भोई यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवराच्या हस्ते करीत जयंतीला सुरुवात करून पारंपारीक वाद्यासह संत भिमा भोई यांच्या पालखीची भव्य मिरवणुक काढण्यात आली होती मिरवणुकीचा समारोप भोईवाडा येथे करण्यात करण्यात आला या प्रसंगी समाजातील विविध क्षेत्रातील प्राविण्य मिळवलेल्या व शालेय विद्यार्थ्याचा स्व जयवंताबाई भोई प्रतिष्ठाणच्या वतीने पारितोषीक व प्रमाणपत्र देऊन मान्यवराच्या हस्ते गौरविण्यात आले
यावेळी मंचावर समाज अध्यक्ष एकनाथ भोई , भरत भोई , नामदेव मोरे , सुनिल भोई , राजेंद्र चौधरी , सुभाष धनगर , रविद्र सोनवणे , बापू मराठे आदीची उपस्थिती होती तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीराम भोई , शंभु भोई , खुशाल भोई , नरेंद्र भोई , कृष्णा भोई , भुरा भोई , जितेंद्र भोई इत्यादीनी परिश्रम घेतले
या प्रसंगी मोठ्या संख्येने महिला , पुरुष व बांधव यांची उपस्थिती होती


