ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

जामनेर ;– ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी आज १३ मे रोजी आपल्या कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला . यावेळी त्यांच्या सोबत पत्नी साधनाताई महाजन आणि दोन्ही कन्या यांच्यासह आदी उपस्थित होते.

आज सकाळपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रीया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलतांना केले.