सौ. योगीता सचिन डेलीवाला यांचे संथाराव्रत सुरू

भुसावळ- येथील धर्मनिष्ठ डेलीवाला परिवाराची सून व सचिन डेलीवाला यांची धर्मपत्नी सौ. योगीता सचिन डेलीवाला यांनी जैन धर्मीय संथाराव्रत ग्रहण केले असून आज त्यांचा नववा दिवस आहे. ५ तारखेला आचार्य भगवान रामलालजी म.सा.यांच्या आज्ञानुवर्ती शासन दीपिका संयमी श्री जी म.सा, रमण श्री जी म.सा, भाग्यश्री जी म.सा. यांच्या साक्षीने सौ. योगीता यांनी सागरी संथारा (अन्न,फळे,दुध त्याग फक्त जल ग्रहण) स्विकारला होता. मात्र आठ मे पासुन समाज शिरोमणी आणि धर्मनिष्ठ व आगम ज्ञानी भुसावळचे प्रेमचंदजी कोटेचा यांच्या वाणीद्वारा त्यांनी चोवीहार संथारा म्हणजेच संपूर्ण त्याग करुन इच्छा मरण याची शपथ घेतली .
श्रध्देय कानमुनीजी म. सा. यांचे शिष्य पु.विजय मुनीजी म.सा. यांनी त्यांना मांगलिक दिली .गच्छाधिपती प्रकाशमुनीजी म. सा. यांच्या आज्ञानुवर्ती पु. अर्पिताजी म. सा. सुरभीजी म. सा. कल्पनाजी म. सा. रोशनी जी म.सा.,रुचीताजी म.सा.यांच्या चातुर्मासा वेळीसुध्दा त्यांनी उत्क्रुष्ट धर्म आराधना केली होती. त्या धर्म आराधनेचा परिणाम म्हणून त्यांना जैन धार्मिक बाबीचे ज्ञान झालेले होते. आज जैन धर्मातील सर्वात खडतर प्रवास व शपथ व अनुष्ठान म्हणजे संथारा म्हणजेच इच्छा मरण! जोपर्यंत आता मृत्यू येत नाही तोपर्यंत त्यांनी अन्न ,पाणी व सर्व बाबींचा त्याग केलेल्या आहेत. त्यांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून व महाराष्ट्राबाहेरून सुद्धा दर्शनार्थी दर्शन घेण्यासाठी येत आहे. सर्व सुरळीत असताना व स्वतःच्या मर्जीने इच्छामरण पत्करणे सोपी गोष्ट नाही असे प्रतिपादन समाजातील विविध गणमान्य करीत आहे. शहरातील धार्मिक परिवार असलेल्या ललवाणी परिवारातील श्री. नलीन ललवाणी व सौ. ज्योती ललवाणी हे दररोज सकाळी व संध्याकाळी त्यांना प्रतिक्रमण ऐकवीत असतात .सौ. योगिता यांच्या या धाडसी धार्मिक अनुष्ठानाचे सर्व स्तरातून धर्म अनुमोदना होत आहे. तरी सर्वांनी अशा महान आत्म्याचे दर्शन गगन क्लासीक,फ्लॅट नं ४ ,आनंद नगर,येथे घेवुन पुण्यार्जन करावे असे आवाहन डेलीवाला परीवार,श्रावक संघ,चातुर्मास समिती पंचायती वाडा, आदिंनी केले आहे.