–

भुसावळ- – महाराष्ट्रातील काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबई येथे झालेल्या 26 /11 आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे हे पाकिस्तानचा आतंकवादी अजमल कसाबच्या हल्ल्यात शहीद झाले नसून पोलिसांच्या गोळीबारात त्यांचा मृत्यु झाला असल्याचे बेताल वक्तव्य वडेट्टीवार यांनी केले. या वक्तव्याचा भुसावळ तालुका शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध दि. ७ मे मंगळवारी करण्यात आला.
मुंबई येथे 26/11 या दिवशी पाकिस्तानी आतंकवादी अजमल कसाब याने छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावर बेछूट अंधाधुंद गोडीबार करून हल्ला केला होता. कसाबच्या या गोळीबारात पोलीस अधिकारी हेमंत करकरे हे शहीद झाले होते. परंतु या घटनेला बरेच वर्षे उलटून गेल्यावर राज्यातील काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी पाकिस्तानी आतंकवादी अजमल कसाब याच्या गोळीबारात पोलीस अधिकारी हेमंत करकरे शहीद झाले नसून पोलिसांनी केलेल्या गोळीबारात करकरे यांचा मृत्यु झाला असल्याचे बेताल वक्तव्य केले. यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या. या विधानाचा भुसावळ तालुका शिवसेनेच्या वतीने मंगळवारी दुपारी शहरातील गांधी पुतळा या भागात जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर यांच्या मार्गदर्शनाने शिवसेनेतर्फे वडेट्टीवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून जाहीर निषेध करण्यात आला. वडेट्टीवार यांनी त्यांचे हे विधान मागे घेण्यात यावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
यावेळी भुसावळ तालुका विधानसभा प्रमुख संतोष माळी, महिला जिल्हा संघटीका नंदा निकम, शहरप्रमुख पवन नाले, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश निकम, अल्पसंख्यांक आघाडीचे उपजिल्हाप्रमुख हमीद पठाण, युवा सेना युवा जिल्हाधिकरी पवन भोळे, शहर संघटक सोनी ठाकूर, शिवसैनिक सुरेश धंडोरे, उपशहर संघटक सौरभ पवार, विभाग प्रमुख किरण महाले, वैशाली विसपुते, आकाश निकम, सुनंदा बगाडे, इंदुबाई सोनवणे, मंजुलाबई महाजन, ममता नरवाडे, ज्योती तायडे आदी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.


