रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस ते वाराणसी दरम्यान उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने लोकमान्य तिलक टर्मिनस ते वाराणसी दरम्यान उन्हाळी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमान्य तिलक टर्मिनस ते वाराणसी उन्हाळी विशेष गाड्या (०८ फेरी)
०४२२७ विशेष लोकमान्य तिलक टर्मिनस येथून दि ०६.०५.२०२४ ते २७.०५ .२०२४ पर्यंत दर सोमवारी १३.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २३.२० वाजता वाराणसी येथे पोहोचेल. (०४ फेऱ्या)
०४२२८ विशेष वाराणसी येथून दि ०४.०५.२०२४ ते २५.०५ .२०२४ पर्यंत दर शनिवारी २२.२० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी १०.३० वाजता लोकमान्य तिलक टर्मिनस येथे पोहोचेल. (०४ फेऱ्या)
थांबे -: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नासिक रोड, भुसावल,खंडवा, इटारसी , भोपाल, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओरई, कानपुर, लखनऊ, अयोध्या कैंट, अयोध्या, शाहगंज आणि जौनपुर
संरचना: एक वातानुकूलित द्वितीय , दोन वातानुकूलित-तृतीय, ८ शयनयान, ९ जनरल सेकंड क्लाससह २ जनरल सेकंड क्लास गार्डचे ब्रेकव्हॅन
टिप :- गाडी क्रमांक ०४२२७ विशेष दिनांक ०६.०५.२०२४ रोजी अनारक्षित मध्ये धावेल.
आरक्षण: ०४२२७ साठी बुकिंग दि. ०८.०५.२०२४ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर विशेष शुल्कावर सुरू होईल.
तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.
प्रवाशांनी या उन्हाळी विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



