भुसावळ
यावल रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणालगत असलेल्या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्व विद्यालय च्या मार्फत दिं 2 मे ते 6 मे 2024 पर्यंत वयोगट 8 ते 14 वर्षाखालील मुलांसाठी विनामूल्य समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. या समर कॅम्प मध्ये मुलांचे शारीरिक , मानसिक, बौद्धिक ,सामाजिक , सांस्कृतिक व आरोग्याच्या दृष्टीने संगीताच्या तालीवर व्यायाम कवायत विविध स्वरूपाचे चर्चासत्र गीत नृत्य नाटिका यांचे प्रशिक्षण सोबतच छोट्या छोट्या गोष्टीतून संस्कार मनोरंजनात्मक खेळ हे या समर कॅम्प मधून विद्यार्थ्यांना शिकवले जाणार आहे यासोबतच विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन स्थिर राहण्यासाठी व त्यांच्यातील चंचलता दूर होण्यासाठी ध्यानधारणा मेडिटेशनवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे . मुलाचे आरोग्य व संतुलित आहार या विषयी तज्ञ व्यक्तीच मार्गदर्शन राहणार आहे. त्याचप्रमाणे पर्यावरण जागर प्रतिष्ठान व शैक्षिक आगाज चे नाना पाटील सर तर्फे विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व वृक्षारोपण कसे करावे कलम कसे लावावे याबाबतची जागृती करण्यात येणार आहे . तसेच सीड बॉल कसे तयार करावे याची प्रशिक्षण देण्यात येणार आहे .तरी पालकांना आवाहन करण्यात येत आहे. त्यांनी आपले मुलं मुली यांना समर कॅम्प साठी सेवाकेंद्र यावल रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणा शेजारी पाठवावे. समर कॅम्प ची वेळ सकाळी ९.३० ते १२ राहील असे सेवा केंद्राच्या प्रमुख संचालिका बीके सिंधू दीदी तसेच बीके ज्योती बहन व अन्य प्रशिक्षण बी के बहिणींनीही कळविले आहे. संस्कारक्षम असलेल्या विनामुल्य समर कॅम्प मध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन केले आहे. संपर्कासाठी 8087577520 , 7028884830 वर संपर्क करावा किंवा प्रत्यक्ष भेटावे .





