भुसावळ निवडणुकीच्या अनुषंगाने क्षेत्रीय व नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न :



भुसावळ – रावेर लोकसभा अंतर्गत
भुसावळ विधानसभा मतदार संघातील सर्व सेक्टर अधिकारी तसेच नोडल अधिकारी यांची आढावा बैठक प्रांत कार्यालयातील तापी सभागृहात पार पडली. मतदानाची तारीख जशी जवळ येत आहे तशी पून्हा एकदा उजळणी घेऊन. प्रांतधिकारी जितेंद्र पाटील यांनी पूर्व मतदान तसेच मतदानाच्या प्रत्यक्ष दिवशी कोणतीही घाई गडबड न करता मतदान कसे सुरळीत पार पाडावे हे सांगितले.
दिव्यांग,अंध,८५ वर्षांवरील वृध्द, अंथरुणाला खिळलेले मतदार किंवा मतदानासाठी मतदान केंद्रावर येऊ शकत नाही अशा लोकांच्या घरी जाऊन मतदान करून घेताना कशी काळजी घ्यायची ह्या सूचना दिल्या. मतदानाविषयी माहिती देऊन सेक्टर ऑफिसर यांना सर्व फॉर्म काळजीपूर्वक भरावे असे सांगितले. तहसीलदार नीता लबडे यांनी झोनल अधिकाऱ्यांना कोणत्याही गोष्टीला घाबरून न जाता निवडणूक पारदर्शक व अचूकपणे पार कशी पाडावी हे समजावून सांगितले.
यावेळी निवडणूक नायब तहसीलदार अंगद आसटकर यांनी सर्व कर्मचाऱ्यांच्या शंकाचे निरसन केले.