भुसावळ – भुसावळ तालुक्यातील शिरपूर कन्हाळा रोडवररिल स्थित व्हीआयपी कॉलनी गेल्या वीस वर्षांपासून रस्ते गटारी , कचरा कुंड्या बाग बगीचे, स्ट्रीट लाईट व इतर सर्व मूलभूत सेवा सुविधांपासून गेल्या 25 वर्षांपासून कायमस्वरूपी वंचित ठेवण्यात आलेली आहे . आज पावतो सदर परिसर हा भुसावळ शहराच्या हद्दीत येत नाही शिरपूर करणारा ग्रामपंचायत येत नाही अशीच उत्तर या परिसरातील रहिवाशांना संबंधित अधिकार्यांनी दिलेली आहे. त्यामुळे या हद्दीच्या वादामध्ये आमची मात्र चांगलीच कुचुंबना होत आहे. आणि या विकसित भारतामध्ये व्हीआयपी कॉलनीतील विविध जाती-धर्माचे रहिवाशी गोरगरीब रहिवाशांचे सोबत असा दुजाभाव केला जात आहे. आम्हाला या विविध मूलभूत सेवा सुविधा जाणून-बुजून जात धर्म आणि परिस्थितीला बघून वंचित ठेवण्यात येत आहे. त्यामुळे एक प्रकारे आम्हाला या परिसराला कोणीही वाली उरलेला नसल्याने आम्ही कोणाच्या कडे न्याय मागावा हाच यक्षप्रश्न आमच्यासमोर उभा राहिला आहे. व्हीआयपी कॉलनी व संपूर्ण परिसरातील अपुऱ्या मूलभूत सेवा सुविधांमुळे आमचे जीवन दररोज अतिशय खालावत चाललेला आहे. परिसरामध्ये कचऱ्याची प्रचंड दुर्गंधी निर्माण झालेली आहे, सांडपाण्याची व्यवस्था नसल्याने या परिसरात आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे व त्यामुळे डासांचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे डेंगूची शक्यता नाकारता येत नाही. या परिसरामध्ये प्रचंड अंधार होत असल्याने रात्री वेळ रात्री चोरांचां धाक निर्माण झाल्यामुळे संध्याकाळी सात वाजे नंतर घराबाहेर पडणे ही भीतीदायक वाटते. त्यामुळे आम्ही मूलभूत सेवा सुविधा पासून अनाथ झाल्यासारखे वाटत आहे. कृपा करून आमची व्हीआयपी कॉलनी व परिसरातील मूलभूत सेवा सुविधा ज्या वर नमूद केल्या आहेत त्या त्वरित पूर्ण न झाल्यास सर्व व्हीआयपी कॉलनी आणि संपूर्ण परिसरातील नागरिक येत्या लोकसभा निवडणुका 2024 पासून तर येणाऱ्या पुढे होऊ घातलेल्या सर्व स्तरातील निवडणुकांमधील मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकनार आहेत .
भुसावळ तालुक्यातील ही व्हीआयपी कॉलनी मधील सर्व मालमत्ता प्लॉट हे यांच्या7/12 उताऱ्यावर भुसावळ शिवार असे नमूद आहे आणि प्लॉटची खरेदी विक्री करताना भुसावळ शहरातील रेडी रेकनर देखील चे भाव या ठिकाणी प्रशासनाकडून लावले जातात. त्यामुळे याबाबत न्याय न मिळाल्यास व्हीआयपी कॉलनी तील सर्व रहिवाशी येत्या लोकसभा निवडणुकांसह सर्व निवडणुकामधील मतदानानंतर सामूहिक बहिष्कार टाकणार आहोत.
,एकीकडे निवडणूक आयोग करोड रुपये खर्च करून मतदार जागृती अभियान राबवतात आणि अशा पद्धतीने आमच्यासारख्या सुद्धा प्रामाणिक मतदारांच्या मूलभूत सेवा सुविधा पुरविण्यात प्रशासन , लोकप्रतिनिधी अपयशी ठरलेले असल्यामुळे सदर मूलभूत सेवा सुविधा रहिवाशांना त्वरित न पुरविल्यास व्ही आय पी कॉलनीतील रहिवाशी येत्या लोकसभे सह सर्व येऊ घातलेल्या निवडणुकांवर बहिष्कार टाकणार असल्याच आणि याविरुद्ध आंदोलन करणार असल्याच निवेदन त्यांनी मुख्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन जिल्हाधिकारी जळगाव यांना पाठविले असल्याचे व्हीआयपी कॉलनी शिरपूर कन्हाला रोड मधील रहिवाशी यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.



