बोदवड तालुक्यात १३ वर्षीय मुलावर अत्याचार :

बोदवड;- तालुक्यातील एका गावात १३ वर्षीय मुलाला एका निर्जन स्थळी नेवून त्याला मारहाण करत अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक घटना शनिवारी २० एप्रिल रोजी दुपारी २ वाजता घडली आहे. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, बोदवड शहरातील एका भागात १३ वर्षीय अल्पवयीन मुलगा हा आपल्या परिवारासह वास्तव्याला असून त्याच भागात राहणाऱ्या एकाने त्याला सोबत भंगार गोळा करून येऊ असे सांगून त्याला मलकापूर रोडवरील एका टायरच्या दुकानाच्या मागे असलेल्या निर्जन ठिकाणी घेवून गेला. तिथे अल्पवयीन मुलाला सोबत घेवून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. हा प्रकार शनिवारी २० एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास उघडकीला आला. याप्रकरणी पिडीत मुलाचे वडीलांनी बोदवड पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार एकावर बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ हे करीत आहे.