भुसावळ – येथील रहिवासी तथा बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील यांना भुसावळ शहर शिवजयंती उत्सव समितीतर्फे शिवभूषण पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.

डॉ. जगदीश पाटील यांनी सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, अध्यात्मिक, पर्यावरण यासह विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना भुसावळ शहर शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी यांच्या हस्ते शिवभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भुसावळ रेल्वेस्थानकाजवळ असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर आयोजित भव्य समारंभात त्यांना भगवा फेटा परिधान करून भगवी शाल, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी जयंती उत्सव समितीचे सचिव उमाकांत नमा शर्मा, राहूल तायडे, मिलिंद कापडे, राजेश भोई, पवन पाटील, हर्षल पाटील, दलजित चौधरी, पंकज हिंगणे यांच्यासह जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो ओळी – शिवभूषण पुरस्काराने डॉ. जगदीश पाटील यांना सन्मानित करताना भुसावळ शहर शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष युवराज लोणारी, सचिव उमाकांत नमा शर्मा, राहूल तायडे यांच्यासह समितीचे पदाधिकारी.


