मध्य रेल्वे प्रवाशांच्या मागणीनुसार मुंबई-गोरखपुर आणि मुंबई-दानापुर दरम्यान ३ जोड्या अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे.

मध्य रेल्वेने उन्हाळी हंगामात मुंबई येथून उत्तरेकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या मागणीच्या अनुषंगाने, प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मुंबई-गोरखपुर आणि मुंबई-दानापुर दरम्यान ३ जोड्या अतिरिक्त उन्हाळी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
गाड्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपुर विशेष
01083 विशेष शनिवारी दि. २०.०४.२०२४ रोजी २३:५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०९:३० वाजता गोरखपुर येथे पोहोचेल.
01084 विशेष सोमवारी दि. २२.०४.२०२४ रोजी १५.३० वाजता गोरखपुर येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी ००.२५ वाजता पोहोचेल.
थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओराई, कानपुर सेंट्रल, लखनऊ, गोंडा आणि बस्ती.
संरचना: १२ शयनयान, १ लगेज कम गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅनसह ५ सामान्य द्वितीय श्रेणी. (१८ डब्बे)
लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपुर विशेष
01085 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई रविवारी दि. २१.०४.२०२४ रोजी २३:५० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०९:३० वाजता गोरखपुर येथे पोहोचेल.
01086 विशेष गाडी मंगळवारी दि. २३.०४.२०२४ रोजी १५.३० वाजता गोरखपुर येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी ००.२५ वाजता पोहोचेल.
थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, उरई, कानपुर सेंट्रल, लखनऊ, गोंडा आणि बस्ती.
संरचना: ३ वातानुकूलित-तृतीय, ७ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी यासह २ लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन. (१६ डब्बे)
लोकमान्य टिळक टर्मिनस-दानापुर विशेष
01081 विशेष रविवारी दि. २१.०४.२०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १९.०० वाजता दानापुर येथे पोहोचेल.
01082 विशेष सोमवारी दि. २२.०४.२०२४ रोजी २२.०० वाजता दानापुर येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०४.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपुर, सतना, मानिकपुर, प्रयागराज छिवकी आणि पं. दीन दयाल उपाध्याय जं.
आरक्षण: विशेष ट्रेन क्रमांक 01083, 01085 आणि 01081 साठी विशेष शुल्कासाठी बुकिंग दि. १९.०४.२०२४ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर उघडेल.
संरचना: २ वातानुकूलित-तृतीय, १४ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी यासह २ लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन. (२० डब्बे)
विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.
प्रवाशांनी या उन्हाळी विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


