भुसावळ : भुसावळ शहरातील एका भागातील रहिवासी असलेल्या 37 वर्षीय महिलेचा असहायतेचा व एकटेपणाचा फायदा घेत तिला मारहाण करीत व धमकी देवून अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी दोघांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
37 वर्षीय महिलेच्या तक्रारीनुसार, पीडीता प्रशिक्षणार्थी प्रकल्पग्रस्त असून नोकरीला आहे. 14 जानेवारी 2023 ते 9 जानेवारी 2024 या दरम्यान संशयित आरोपी रवींद्र गोलांडे (चोरवड, ता.भुसावळ) याने महिलेचा एकटेपणाचा गैरफायदा घेत तिला अश्लिल शिवीगाळ व मारहाण करत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. या अत्याचारासाठी आरोपीचा मित्र लक्ष्मण कोळी (दीपनगर, भुसावळ) याने रिक्षा उपलब्ध करून मदत केली. हा अत्याचार सहन न झाल्याने महिलेने अखेर शुक्रवार, 5 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून दोघांविरोधात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी रवींद्र गोलांडे आणि त्याचा साथीदार लक्ष्मण कोळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विष्णू सांगळे हे करीत आहे.



