भुसावळ – विद्यार्थी हा महाविद्यालयाचा केंद्रबिंदू असतो विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार महाविद्यालयाचा दर्जा ठरतो असे मत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव चे प्रकुलगुरु डॉ. एस.टी. इंगळे यांनी व्यक्त केले आज भुसावळ येथे कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ येथील वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी डॉ. इंगळे बोलत होते

त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पुस्तकी ज्ञानाबरोबरच महाविद्यालयात राबविल्या जाणाऱ्या एनएसएस, एनसीसी ,स्पोर्ट्स ,सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी महत्त्वाचे असतात अशी माहिती त्यांनी दिली तसेच विद्यापीठामार्फत राबवल्या जाणाऱ्या कमवा व शिका योजनेवर भाष्य करून विद्यापीठा मार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांवर प्रकाश टाकला याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. मोहन फालक अध्यक्षस्थानी उपस्थित होते त्यांच्या समवेत सचिव श्री विष्णू चौधरी कोषाध्यक्ष संजय नाहाटा ज्येष्ठ संचालक .प्रभाकर पाटील ,निळकंठ भारंबे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही .पाटील उपप्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे डॉ. ए.डी. गोस्वामी समितीप्रमुख डॉ. एस.टी. धूम आधि सभा सदस्य प्रा. एकनाथ नेहेते कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. वाय .एम .पाटील पर्यवेक्षक प्रा. स्वाती पाटील व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक यांनी अध्यक्ष समारोप केला त्यात त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या भावी जीवनाच्या शुभेच्छा देऊन कौतुक केले बक्षीसांपेक्षा कौतुकाची थाप महत्त्वाची असते असे मत व्यक्त केल त्यानंतर कला, वाणिज्य, विज्ञान विद्याशाखेतील तसेच एनएसएस एनसीसी क्रीडा कला सांस्कृतिक इत्यादी विभागांमध्ये विशेष पारितोषिके प्राप्त केली अशा एकूण 85 विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसह मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकेतून गौरविण्यात आले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. चंद्रकांत सरोदे यांनी केले तर बक्षीस वितरणाचे वाचन प्रा. डॉ. ममताबेन पाटील आणि प्रा. डी. एन .पाटील यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समिती सदस्यांबरोबरच प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले असे प्रा.प्रशांत पाटील यांनी कळविले आहे




