मुक्ताईनगर तालुका हादरला : 35 वर्षीय महिलेचा अनैतिक संबंधातून खून :


मुक्ताईनगर – तालुक्यातील कु -हा काकोडा – महालखेडा येथील ३५ वर्षीय महिलेचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना दिनांक 5/4/2024रोजी सायंकाळी उघडकीस आल्याने एकाच खळबळ उडाली आहे .

सदर महिलेच नाव सौ मालताबाई मनोज खुळे वय ३५ असे आहे .ही महिला स्वतः च्या शेतात काम करण्यासाठी गेली होती . नियमितपणे दररोज पाच वाजता घरी यायची परंतु साडेपाच वाजले तरीसुद्धा महिला घरी न आल्याने घरातील मंडळी मुलगा व सासरा शेताच्या दिशेने तिला पाहण्यासाठी गेले असता गावाच्या व शेताच्या मध्यभागी गेल्यानंतर नाल्यामध्ये सदर महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली त्यांना दिसली . तिच्या अंगावरती डोक्यावरती दगडाने मार मारलेला होता यामध्ये तिचा मृत्यू झालेला होता याबाबत नातेवाईकांना माहिती दिली असता त्या ठिकाणीनातेवाईक तात्काळ हजर होऊन सदर घटनेची पाहणी केली खून झाल्याचे लक्षात येताच नातेवाईकांनी पोलिसांना कळवले घटनास्थळी मुक्ताईनगर पीआय नागेश मोहिते पाटील व आपले स्टॉप सह घटनास्थळी हजर झाले सदर घटनेची पाहणी केली असता सदर महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आणि शेजारी मोठ मोठे पंधरा-वीस किलोचे दगड डोक्यात टाकलेले दिसून आल्या जागेचा पंचनामा करून मुक्ताईनगर जिल्हा उप रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे

शुक्रवार, 5 एप्रिल रोजी संध्याकाळी 6.15 वाजेच्या पुर्वी महालखेडा शिवारातील डाबर नाल्याजवळ महिलेचा मृतदेह आढळून आला होता. पोलीस तपासात महिलेची ओळख पटली. त्यानंतर मयत महिलेच्या अल्पवयीन मुलाच्या फिर्यादीवरून संजय सुधाकर पाटील (रा. महालखेडा ता. मुक्ताईनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय पाटीलचे मयत महिलेसोबत अनैतिक संबंध होते. मयत महिलेसोबत याच मुद्यावरून तो वाद सुध्दा करत असायचा. याच वादातून शुक्रवारी त्याने डोक्यात दगड टाकुन, शरिरावर गळ्यावर धारदार हत्याराने वार करुन संबंधित महिलेचा खून केला. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.