भुसावळ : शहरातील कला, विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्ता राखत विशेष प्रावीण्य महाविद्यालयात व विद्यापीठात प्राप्त केले आहे अशा विद्यार्थ्यांना शनिवार, 6 रोजी महाविद्यालयाच्या वाचन कक्षात सकाळी 11 वाजता गौरवण्यात येणार आहे.

यांची राहणार कार्यक्रमास उपस्थिती
अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक असतील. प्रमुख पाहुणे म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव प्र.कुलगुरू डॉ.एस.टी.इंगळे उपस्थित असतील. यावेळी ताप्तीचे चेअरमन महेश फालक, सचिव विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजय नाहाटा, ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे संचालक उपस्थित राहणार आहेत. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक वर्ष 2022- 23 मध्ये 11 वी व 12 वी तसेच किमान कौशल्य यासह मानव्य विद्या, वाणिज्य शाखा, विज्ञान शाखेत या प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे तसेच महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष 2022 -23 मध्ये एन.एस.एस .,एन.सी.सी , क्रिडा आणि संस्कृती क्षेत्रात ज्या ज्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ पातळीवर, राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर विशेष प्राविण्य मिळवल आहे त्या विद्यार्थ्यांचा गुण गौरव करण्यात येणार आहे. गुणवंतांसह त्यांच्या पालकांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.व्ही.पाटील, उपप्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे, डॉ.ए.डी.गोस्वामी, पारितोषिक समितीचे चेअरमन डॉ.एस.टी.धूम आणि सर्व प्राध्यापकांनी केले आहे.


