भुसावळातील सराईत सोनसाखळी चोर मध्यप्रदेशात जेरबंद : आरोपीं विरोधात अनेक गुन्हे दाखल : एमआयडीसी पोलिसांची कामगिरी : विशेष पथकातील कर्मचाऱ्यांचा पोलीस अधीक्षकांनी केला गौरव :


जळगाव : सेंधवा तालुक्यातील जुलवानिया येथील इराणी वस्तीतून भुसावळ शहरातील अट्टल सोनसाखळी (चैन) चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. दोन दिवस वेषांतर करीत पोलीस या भागात वावरत आरोपींच्या मागावर राहिले व आरोपी हातात लागताच त्यांच्या मुसक्या बांधण्यात आल्या.या कामगिरी बद्दल विशेष पोलीस पथकातील या कर्मचार्‍यांचा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी जळगावात सन्मान केला.
जळगावातील गायत्री नगरात पायी जात असलेल्या सुलोचना वसंत खैरनार (60) या वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरुन आलेल्यांनी लांबवल्या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील संशयीत मध्यप्रदेशातील सेंधवा तालुक्यातील जुलवानिया येथील असल्याचे निष्पन्न झाले होते. विशेष पोलीस पथकाने या भागात दोन दिवस वेषांतर करीत पाळत ठेवली व आरोपी बाहेर निघताच त्यांच्या मुसक्या आवळल्या. ओळख परेड बाकी असल्याने या आरोपींचे नाव जाहीर करण्यात आले नाही. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक, उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन, नंदुरबार शहर पोलीसस ठाण्याच्या हद्दीत दोन अशा एकूण पाच गुन्ह्यात हे संशयित पसार असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. संशयितांकडून 40 हजार रुपयांची मंगलपोत जप्त करण्यात आली .
जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक् दीपक जगदाळे, दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, हवालदार गणेश शिरसाळे, पोलीस नाईक विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी, छगन तायडे, किरण पाटील, राहुल रगडे, विशाल कोळी, राजश्री बाविस्कर यांनी ही कारवाई केली.
सोनसाखळी चोरांकडून चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येणार असल्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे .