वरणगाव – नगर परिषदेचे शहराच्या पाणी पुरवठ्यावर नियोजन नसल्याने नगरीकाना दहा ते बारा दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्याने प्रशासना विरोधात तिव्र नाराजी व्यक्त केली जात असल्याने भाजपा पदाधिकाऱ्यांनी पालीका कार्यालयात धडक देत मुख्याधिकाऱ्यांना याचा जाब विचारत पाणी पुरवठा सुरळीत करा अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला

शहरात मागील काही दिवसापुर्वी तात्रीक कारणास्तव्यक्त पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता त्यावेळीही भाजपा पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन पाण्याची समस्य माडली होती त्याची दखल घेवून नगर परिषदेला भेट देत मुख्याधिकारी सचिन राऊत व पाणी पुरवठा अभियंता पवार यांना सुचना देऊन पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले होते मात्र थोड्याच दिवसांत पाण्याची परिस्थिती जैसे थे झाल्यानंतर नागरिकाची पाण्यसाठी भंटकंती करावी लागत असल्याने गुरुवार दि ३ रोजी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुखाधिकारी सचिन राऊत यांच्या कार्यालयात धडक देत निव्वळ नगर परिषदेच्या नियोजना आभावी शहराला दहा ते बारा दिवसानी पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप करीत शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करून किमान चार दिवसानंतर नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात यावा असे नाही केल्यास दि ८ शुक्रवार रोजी नगर परिषद प्रशासना विरोधात मोर्चा काढण्याचा इशारा दिला
यावेळी भाजपाचे सुनिल काळे , शे अखलाक शे युसुफ , सुनिल माळी , शामराव धनगर ,प्रणीती पाटील , डॉ सादिक शेख , अनिल वंजारी , नाना चौधरी , हितेश चौधरी , डॉ प्रविण चादणे , अंकुश साबळे , नीता तायडे मुस्लीम अन्सारी , समाधान कोळी आदी प्रमुख पदाधिकाऱ्यास नागरिक उपस्थित होते
नगरपरिषदेचे आवाहन
उन्हाळा सुरू झाल्यानंतर पाण्याची मागणी वाढल्याने पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम होत आहे मात्र लवकरच नारी मळा परिसरातील व विकास कॉलनी परिसरातील नविन जलकुंभ सुरू केले जाणार असल्याने बऱ्यापैकी पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी मदत होईल मात्र तुर्त नागरिकांनी पाणी काट कसरीने वापरावे व नगर परिषदेला सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे


