भुसावळ – भुसावळ महसूल उपविभागातील भुसावळ तहसिल कार्यालयास जिल्हाधिकारी जळगांव यांचे कार्यालयाकडून सन 2023-2024 या आर्थिक वर्षाकरीता महसूल वसुलीचे 12.35 कोटी रुपयाचे उद्दिष्ट देण्यात आलेले होते.
उपविभागाचे प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील तसेच तालुक्याचे तहसिलदार श्रीमती निता लबडे यांचे अचुक नियोजनामुळे यंदाही सलग तिस-या वर्षी भुसावळ तालुक्याने 31 मार्च पूर्वीच 110.00% वसुली करुन जिल्हयात तालुक्याने मान मिळविलेला आहे.
यापूर्वीही सन 2021-2022, 2022-2023 या आर्थिक वर्षात अनुक्रमे 105.00% व 173.00% विक्रमी वसुली केलेली असुन यंदाही तालुक्यांने मुदतीच्या आत वसुली पूर्ण करुन हॅट्रीक साधली आहे. महसूल वसुलीमध्ये विविध पथके नेमुन अवैध गौण खनिज कारवाई करुन, वाहन जप्ती लिलाव तसेच दंडात्मक वसुली तसेच तालुकयातील स्टोन क्रशर धारक यांचे कडून स्वामीत्वधनाची रक्कम 8.17 कोटी रुपये तसेच जमीन महसूलीची रक्कम 5.48 कोटी अशी एकुण 13.65 कोटी वसुल करण्यात आलेले आहे. या कामगीरीमध्ये प्रांत अधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार, महसूल सहाय्यक, तालुक्यातील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी व कोतवाल यांचे योगदान उल्लेखनीय आहे.



