यावल -फैजपुर रस्त्याने अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या सुसाट डंपरचा भिषण अपघात : डंपरचे झाले दोन तुकडे :


यावल – यावल फैजपुर रोडवर सुसाट वेगाने धावणाऱ्या अवैद्य गौण खनिजची अवैद्य वाहतुक करणाऱ्या डंपरचा आज सकाळी भिषण अपघात झाल्याची घटना घडली आहे अपघात इतका भिषण आहे की यात डंपरची दोन तुकडे झालेत, सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे वृत्त आहे . यावल तालुक्यात मोठया प्रमाणावर रात्रीच्या वेळीस भरधाव वेगाने डंपराव्दारे किंवा ट्रॅक्टर व्दारे अवैद्य वाळुची वाहतुक करण्यात येत असते

यावल फैजपुर मार्गावरील ढाके वकील यांच्या शेताजवळच्या पुढील वळणावर आज दिनांक ३१ मार्च रविवार रोजी पहाटे ३ते ४ वाजेच्या सुमारास यावल ते चितोडा रस्त्या दरम्यान वाळुची वाहतुक करणाऱ्या एका चार चाकी डंपरचा भिषण अपघात झाला डंपरचा वेग ईतका होता की यात डंपरचे दोन तुकडे झाले आहे अपघात झाल्यानंतर डंपर सोडून चालक घटनास्थळा वरून फरार झाला आहे

. या मार्गावर मोठया संख्येत अनेक जेष्ठ नागरिक व महिला या मॉर्निंग वॉक करीता जात असतात सुदैवाने आज या मार्गावर कोणीही पादचारी नसल्याने अनर्थ टळला . तरी महसुलच्या संबंधित अधिकारी यांनी अशा प्रकारे होणाऱ्या अवैद्य गौण खनिजच्या वाहतुकीवर बंदी आणावी अशी जोरदार मागणी या परिसरातील नागरिकाणी केली आहे .