बनारस -दानापूर – समस्तीपूर, प्रयागराज गोरखपूर दरम्यान १५६ उन्हाळी विशेष गाड्या धावणार ;

मध्य रेल्वे मुंबई – बनारस / दानापूर / समस्तीपूर, प्रयागराज / गोरखपूर दरम्यान १५६ उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे.

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने १५६ उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील पुढीलप्रमाणे आहे

लोकमान्य टिळक टर्मिनस-बनारस साप्ताहिक विशेष (२६ फेऱ्या)

01053 साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. ०३.०4.२०२४ ते दि. २६.०६.२०२४ (१३ फेर्‍या) दर बुधवारी १२.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १६.०५ वाजता बनारस येथे पोहोचेल.

01054 साप्ताहिक विशेष गाडी दि. ०४.०४.२०२४ ते दि. २७.०६.२०२४ (१३ फेर्‍या) दर गुरुवारी बनारस येथून २०.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २३.५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

थांबे: कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज चियोकी, जेनाथपूर आणि वाराणसी

संरचना: एक वातानुकूलित प्रथम श्रेणी, दोन वातानुकूलित- द्वितीय, ६ वातानुकूलित-तृतीय, ८ शयनयान, ३ सेकंड सीटिंग चेअर कार, १ गार्डची ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार

लोकमान्य टिळक टर्मिनस-दानापूर द्वि-साप्ताहिक विशेष (५२ फेऱ्या)

०१४०९ द्वि-साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. ०१.०४.२०२४ ते दि. २९.०६.२०२४ (२६ फेऱ्या) दर सोमवार आणि शनिवारी १२.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १७.०० वाजता दानापूर येथे पोहोचेल.

01410 द्वि-साप्ताहिक विशेष दानापूर दि. ०२.०४.२०२४ ते दि. ३०.०६.२०२४ (२६ फेऱ्या) दर मंगळवार आणि रविवारी १८.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २३.५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

थांबे: कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज चियोकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.

संरचना: एक वातानुकूलित प्रथम श्रेणी, दोन वातानुकूलित- द्वितीय, ६ वातानुकूलित- तृतीय, ८ शयनयान, ३ सेकंड सीटिंग चेअर कार, १ गार्डची ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार.

लोकमान्य टिळक टर्मिनस-समस्तीपूर साप्ताहिक विशेष (२६ फेऱ्या)

01043 साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. ०४.०४.२०२४ ते दि. २७.०६.२०२४ (१३ फेऱ्या) दर गुरुवारी १२.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २१.१५ वाजता समस्तीपूर येथे पोहोचेल.

01044 साप्ताहिक विशेष समस्तीपूर दि. ०५.०४.२०२४ ते दि. २८.०६.२०२४ (१३फेऱ्या) दर शुक्रवारी २३.२० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०७.४० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

थांबे: कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज चियोकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, हाजीपूर आणि मुझफ्फरपूर.

संरचना: एक वातानुकूलित प्रथम श्रेणी, दोन वातानुकूलित- द्वितीय, ६ वातानुकूलित- तृतीय, ८ शयनयान, ३ सेकंड सीटिंग चेअर कार, १ गार्डची ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार.

लोकमान्य टिळक टर्मिनस-प्रयागराज सुपरफास्ट एसी साप्ताहिक विशेष (२६ फेऱ्या)

01045 वातानुकूलित साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. ०९.०४.२०२४ ते दि. ०२.०७.२०२४ (१३ फेर्‍या) दर मंगळवारी १२.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११.०० वाजता प्रयागराज येथे पोहोचेल.

01046 वातानुकूलित साप्ताहिक विशेष प्रयागराज येथून दि. १०.०४.२०२४ ते दि. ०३.०७.२०२४ (१३ फेऱ्या) दर बुधवारी १८.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १६.०५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

थांबे: कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, सतना आणि माणिकपूर.

संरचना: एक वातानुकूलित प्रथम श्रेणी, तीन वातानुकूलित- द्वितीय, १५ वातानुकूलित- तृतीय, १ हॉट बुफे कार आणि १ जनरेटर कार.

लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर साप्ताहिक विशेष (२६ फेऱ्या)

01123 साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. ०५.०४.२०२४ ते दि. २८.०६.२०२४ (१३ फेर्‍या) दर शुक्रवारी १२.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १८.५५ वाजता गोरखपूर येथे पोहोचेल.

01124 साप्ताहिक विशेष गोरखपूर दि. ०६.०४.२०२४ ते दि. २९.०६.२०२४ (१३ फेऱ्या) दर शनिवारी २१.१५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०७.२५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

थांबे: ठाणे कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, उरई, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा आणि बस्ती.

संरचना: दोन वातानुकूलित- द्वितीय, ६ वातानुकूलित- तृतीय, ८ शयनयान, ३ दुसरी सीटिंग चेअर कार, १ गार्डची ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार.

आरक्षण: उन्हाळी विशेष ट्रेन क्रमांक 01053, 01409, 01403, 01045 आणि 01123 साठी विशेष शुल्कासाठी बुकिंग दि. ३०.०३.२०२४ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर उघडेल.

विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.