शिवसेनेच्या आढावा बैठकीत ‘उबाठा’च्या अनेक पदाधिकाऱ्यांचा प्रवेश : वरणगावात तालुक्याची आढावा बैठक संपन्न ; भुसावळला लवकरच भव्य मेळावा होणार :

वरणगाव – शिवसेना भुसावळ तालुका विधानसभा क्षेत्राची आढावा बैठक २६ मार्च रोजी सायंकाळी वरणगाव येथे झाली. या बैठकीत शिवसेना (उबाठा) चे अनेक पदाधिकाऱ्यांनी जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला. तसेच आगामी काळात भुसावळला तालुक्याचा भव्य असा शिवसेनेचा मेळावा घेण्याचे सर्व पदाधिकाऱ्यांचे एकमत झाले. या मेळाव्याला मुख्य मार्गदर्शक म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना बोलवण्याचे ठरविण्यात आले.

शिवसेना भुसावळ विधानसभेच्या पदाधिकारी आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर होते. नवनियुक्त विधानसभा प्रमुख संतोष माळी, तालुकाप्रमुख विकास पाटील, उप जिल्हा संघटक निलेश सुरडकर, भुसावळ शहरप्रमुख पवन नाले यांचा जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी सत्कार केला.

याप्रसंगी संघटनेच्या कामकाज विषयी आढावा घेण्यात आला. ज्येष्ठ शिवसैनिक तसेच पदाधिकारी शिवसेनेकांशी चर्चा विनिमय करून लवकरात लवकर संघटनेची बांधणी करून कामाला लागावे. तसेच गाव तेथे वार्ड तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक ही संकल्पना राबवण्याचे ठरले. तसेच होऊ घातलेल्या रावेर लोकसभेच्या निवडणुकीसाठी रणनीती ठरविण्याचे ठरले. त्यासाठी लवकरात लवकर भुसावळ विधानसभेचा मेळावा घेण्याचे ठरविण्यात आले. तसेच बुथप्रमुख यांच्या नेमणुका करणे तचेच शिवदुत या नेमणुका अपूर्ण आहेत त्या पूर्ण करण्याचे ठरले.

यावेळी जेष्ठ शिवसैनिक सुरेश चौधरी, माजी नगरसेवक प्रकाश निकम, नयन सुरवाडे, प्रशांत पाटील, पवन मेहरा, प्रल्हाद माळी, किरण माळी, सोनी ठाकूर, अमोल कोळी, गोलू भोई, सौरभ पाटील, अंकुश निकम, विकी मोरे, पंकज पाटील, नितीन पाटील, नाना माळी, अक्षय गावंडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते..

  • शिवसेना (उबाठा) च्या या पदाधिकाऱ्यांनी केला प्रवेश

वरणगावचे माजी शहरप्रमुख दुर्गेश बेदरकर, उपतालुका युवा अधिकारी जितेंद्र पाटील, उप शहर संघटक राकेश चौधरी, शिवसैनिक सुरेश धंडोरे, विनोद कचवे यांनी शिवेनेत प्रवेश केला.