भुसावळ – नॅशनल हायवे क्रमांक ६ वर फेकरी बायपास जवळ गाडी वरील नियंत्रण सुटल्याने आयशर पलटी होऊन त्याखाली भुसावळातील श्रीराम नगर भागातील रहिवाझी चालकाचा गाडी खाली दबून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना येथे घडली .
वरणगाव हुन भुसावळ कडे येत असतांना वरणगाव रोड सोसायटी वाईन शॉप समोर रोडवर (ता.२४) रोजी दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान सुनील जगन्नाथ पाटील (वय.४४) राहणार दत्त नगर, महादेव मंदिर जवळ भुसावळ हा त्याचे ताब्यातील टाटा कंपनीची आयशर गाडी क्रमांक (एम.एच.१९ सी.वाय) ही गाडी घेवून जात असतांना सदर ठिकाणी वळणावर त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले , यावेळी गाडीचे मागील बाजूचे टायर फुटल्याने गाडी पलटी झाली यात गाडी चालक सुनील जगन्नाथ पाटील (वय.४४) राहणार दत्त नगर, महादेव मंदिर जवळ भुसावळ गाडी खाली दाबला जावून मयत झाला आहे. याबाबतीत फिर्यादी घनश्याम जानकीराम पाटील ( वय.३४) राहणार चमेली नगर,वांजोळा रोड भुसावळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान घटनेचे वृत्त कळताच घटनास्थळी घटनेची माहिती मिळताच पोलिस व एन.एच.आय.चे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. पोलिस व नागरिकांच्या मदतीने मृतदेह भुसावळ येथील ट्रामा सेंटरमध्ये हलविण्यात आला आहे सुनील यांच्या मृत्यूमुळे श्रीराम नजर परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे




