भुसावळात वाहनांचे टायर फुटल्याने श्रीराम नगर येथील एकाचा मृत्यू ! –

:

भुसावळ – भुसावळ शहरातील वरणगांव रोड सोसायटी वाईन शॉप समोर रोडवर (ता.२४) रोजी दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान चुलत भाऊ सुनील जगन्नाथ पाटील (वय.४४) राहणार दत्त नगर, महादेव मंदिर जवळ भुसावळ हा त्याचे ताब्यातील टाटा कंपनीची गाडी क्रमांक (एम.एच.१९ सी.वाय) ही भुसावळ वरणगांव रोड सोसायटी वाईन शॉप समोर रोडवरून घेवून जात असतांना सदर ठिकाणी वळणावर त्याच्या ताब्यातील गाडीचे मागील बाजूचे टायर फुटल्याने सदरची गाडी ही पलटी झाली व सदर गाडी खाली दाबला जावून तो मयत झाला आहे. फिर्यादी घनश्याम जानकीराम पाटील ( वय.३४) राहणार चमेली नगर,वांजोळा रोड भुसावळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.