भुसावळ – येथील बियाणी मिलिटरी स्कूल मध्ये दि २३ रोजी वार्षिक पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बियाणी एज्युकेशन ग्रुपचे चेअरमन मनोज बियाणी तर प्रमुख अतिथी म्हणून भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन पडघन,डॉक्टर वृषाली चौधरी व बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या सचिव डॉ.संगीता बियाणी तर विशेष अतिथी म्हणून राजू पारीख व प्रवीण भराडीया उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते विविध शैक्षणिक व शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांना प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस वितरण करण्यात आले. पो.नि् गजानन पडघन यांनी बियाणी मिलिटरी स्कूल विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांचे उत्कृष्ट आयोजन करत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासक्रमासोबत शारीरिक व मानसिक विकासावर भर द्यावा तसेच यूपीएससी, एमपीएससी, एनडीए सारख्या स्पर्धा परीक्षांची आतापासून तयारी करावीअसे मत त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी बियाणी एज्युकेशनच्या विविध संस्थांचे प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शाळेचे प्राचार्य डी एम पाटील यांनी मान्यवरांचे आभार मानले. वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

फोटो कॅप्शन – गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देताना गजानन पडघन सोबत डावीकडून कांचन जोशी,डॉ. वृशाली चौधरी,डॉ. संगीता बियाणी,मनोज बियाणी, राजू पारिक, प्रवीण भराडीया,रुद्रसेन गंठिया,डी एम पाटील आदी.


