राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनासाठी बूथ पर्यंत काम करावे… ना.अनिल पाटील : भुसावळ येथील मेळाव्यात कार्यकर्त्यांना सूचना : शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केला प्रवेश ,



भुसावळ- राष्ट्रवादी काँग्रेसच्या मजबुतीसाठी प्रत्येक कार्यकर्त्याने बूथ लेव्हल पर्यंत संघटन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील यांनी राष्ट्रवादी रावेर लोकसभा मतदारसंघ प्रवेश व कार्यकर्ता मेळाव्यात बोलतांना केले. यावेळी व्यासपीठावर रावेर लोकसभा क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, जळगांव लोकसभा क्षेत्र जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बँक चेअरमन संजय पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य घनश्याम अग्रवाल, नारायण पाटील, राज्य सरचिटणीस रविंद्र पाटील, युवक जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडीया, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष रविंद्र सपकाळे, महिला जिल्हाध्यक्ष सोनाली पाटील,उत्तर महाराष्ट्र महिला प्रमुख अभिलाषा रोकडे, युवती जिल्हाध्यक्ष सविता भोसले,ग्रंथालय सेल जिल्हाध्यक्ष रिटा बावस्कर,अश्विनी देशमुख,रमेशदादा पाटील, भुसावळचे शहराध्यक्ष संतोष चौधरी (दाढी), मक्काभाई,अल्पसंख्याक शहराध्यक्ष नदीम बागवान,जिल्हा उपाध्यक्ष गुणवंत नीळ,संजय काकडे,नासिर शेख,युवक शहराध्यक्ष वसीम शेख कार्याध्यक्ष निलेश कोलते उपस्थित होते.
यावेळी बोलतांना ना.अनिल पाटील यांनी कोणी कितीही प्रयत्न केले तरी रावेर लोकसभा मतदारसंघात महायुतीचाच उमेदवार निवडून येईल हे सांगतांना माजी आमदार संतोष चौधरी यांना “शो बाजी” करणारे अशी कोपरखळी मारली.तसेच आ.एकनाथ खडसे यांच्या भूमिकेवरही टीकेची झोड मारली. मेळाव्यात अनेक युवक-युवती तसेच महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेळाव्याचे आयोजक,रावेर लोकसभा क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी केले. यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र सपकाळे,महिला जिल्हाध्यक्ष सोनाली पाटील,युवती उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अभिलाषा रोकडे यांचीही समयोचित भाषणे झाली.
मेळाव्याला रावेर लोकसभा मतदारसंघातील सुमारे दोन हजार कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन युवक जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडीया यांनी केले. मेळावा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी, सर्वच तालुकाध्यक्ष, सरचिटणीस, विविध फ्रंट चे पदाधिकारी उपस्थित होते.