लोकमान्य टिळक टर्मिनस-कानपुर साप्ताहिक विशेष गाडीच्या २६ जादा फेऱ्या


प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस ते कानपुर दरम्यान धावणाऱ्या अतिजलद साप्ताहिक विशेष ट्रेनच्या २६ जादा फेऱ्या चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस – कानपुर अतिजलद साप्ताहिक विशेष (२६ फेऱ्या)

04152 अतिजलद साप्ताहिक विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. ०६.०४.२०२४ ते दि. २९.०६.२०२४ या कालावधीत दर शनिवारी १७.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १५.४५ वाजता कानपुर सेंट्रल येथे पोहोचेल. (१३ फेऱ्या)

04151 अतिजलद साप्ताहिक विशेष गाडी दि. ०५.०४.२०२४ ते दि. २८.०६.२०२४ या कालावधीत दर शुक्रवारी कानपुर सेंट्रल येथून १५.२५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १४.५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. (१३ फेऱ्या)

थांबे: भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज, भरवारी, सिराथू और फतेहपुर

संरचना: १ वातानुकूलित द्वितीय, ८ वातानुकूलित तृतीय, ८ शयनयान आणि ७ जनरल सेकंड क्लास मध्ये २ लगेज गार्ड ब्रेक व्हॅन (२४ डबे) आहेत.

आरक्षण : अतिजलद साप्ताहिक विशेष गाडी क्रमांक 04152 च्या विस्तारित प्रवासासाठी विशेष शुल्कावर बुकिंग दि. २३.०३.२०२४ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रे आणि www.irctc.co.in संकेतस्थळावर सुरू होईल.

या विशेष गाडीच्या थांब्यावरील सविस्तर वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा

प्रवाशांनी या विस्तारित सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.