जळगांव:- महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ जळगांव , कास्ट्राईब माध्यमिक शिक्षक संघटना यांच्या वतीने शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांची चंद्रपूर वरून बदली होऊन जळगाव येथे नियुक्ती करण्यात आली. त्या निमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला

प्रसंगी उपशिक्षणाधिकारी रागिणी चव्हाण उपस्थित होत्या राज्य संघटनेचे उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉ .प्रदीप साखरे जिल्हा उपाध्यक्ष डॉ .संजय निकम महानगर अध्यक्ष डॉ.विलास नारखेडे तालुका भुसावळ तालुका अध्यक्ष ज्ञानदेव धांडे भुसावळ तालुका सचिव विलास पाटील जळगाव महानगर चे.संतोष पाटील. आर. आर. धनगर आदी उपस्थित होते. प्रसंगी क्रीडा शिक्षकांच्या विविध समस्या वरती चर्चा करण्यात आली व क्रीडा शिक्षकांची पद संच मान्यतेत आल्याबद्दल शिक्षणाधिकारी व शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी तसेच राज्य सरकार यांचे संघटनेच्या वतीने अभिनंदन केले क्रीडा शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे शिक्षण अधिकारी कल्पना चव्हाण यांनी सांगितले.


