अज्ञात वाहनाच्या धडकेत काळवीट गंभीर जखमी ; सचिन माळीने रुग्णालयात नेवून दिले जीवदान

वरणगाव राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल वेस्टन जवळ रस्ता ओलांडणाऱ्या काळविटाला अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने गंभीर जखमी झाले ,यात मागील दोन्ही पायास गंभीर जखमी झाल्याची घटना घडली यावेळी घटनेची माहिती मिळताच शहरातील सचिन (पप्पू) माळी यांनी त्वरित धाव घेऊन काळवीटाला उपचारासाठी पशु वैद्यकिय रुग्णालयात आणले

      या बाबत असे की राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल वेस्टन जवळ दुपारच्या वेळी फुलगाव शेती शिवारा कडून अंदाजे चार वर्षाचे काळवीट महामार्ग ओलाडून जाडगाव शेती शिवाराच्या दिशेने पळत जात असताना अचानाक समोरून येणाऱ्या अज्ञात वाहणाने काळवीटास जबर धडक दिल्याने त्याच्या मागील दोन्ही पायाचा अक्षरशा चैदामेंदा झाला हे दृश्य बाजूला असलेल्या ऊसाची रसवंती चालक नाना माळी यांच्या लक्षात येताच त्यांनी सचिन (पप्पू ) माळी यांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली सचिन आपली चारचाकी कार घेऊन घटना स्थळाकडे धाव घेतली तोवर काळवीट आपल्या जिवाच्या आकांताने दोन्ही पातळ पाय घेत रस्त्याच्या कडेला असलेल्या मक्याच्या शेतात जाऊन पडले होते  यावेळी माळी यांनी  जखमी काळविटास शोधुन आपल्या चारचाकी वाहनात घालून वरणगाव येथील पशु वैद्यकिय रुग्णालयात उपचारासाठी आणले दरम्यान वन विभागाच्या कर्मचाऱ्यास घटनेची माहिती दिली डॉ दर्शना उभाडे यांनी काळवीटावर प्राथमिक उपचार केले व  त्याला वन विभागाच्या ताब्यात दिल्या नंतर  त्याला जळगाव येथे हलविण्यात आले आहे 

सचिन माळीचे कौतुक

हातातील काम सोडून घटना स्थळावर धाव घेत जखमी काळवीटास उपचारासाठी घेऊन आल्याने एक प्रकारे काळवीटास जिवदानच दिल्याने शहरात त्यांचे कौतुक केले जात आहे यापुर्वीही बोहर्डी जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या घुबडास जिवदान दिले होते

पाण्याची व्यवस्था करावी

उन्हाळा सुरू झाल्याने जंगल परिसरात वन्य प्राण्यांला पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने ते गावाच्या दिशेने येतात असेच मागील तीन ते चार दिवसा पासून हे काळवीट रस्ता इकडून तिकडे ये जा करीत असल्याने हा प्रकार घडला जर वन विभागाने वन्य प्राण्यांसाठी जंगलात ठिकठिकाणी कृतीम प्रकारचे तळ्या सारखे करून त्यात पाणी भरून ठेवले तर किमान उन्हाळात प्राण्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल अशी भावना रसवंती चालक नाना माळी यांनी व्यक्त केली आहे