भुसावळात आगमनानंतर माजी आमदार चौधरी यांचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत ; विजय आपलाच, ‘नो चिंता’ चौधरी म्हणाले

भुसावळ ,

रावेर लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे दावेदार माजी आमदार संतोष चौधरीयांचे बुधवारी दुपारी 12 वाजता भुसावळ रेल्वे स्थानकावर आगमन होताच ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी बेभान होवून नृत्य करीत फटाक्यांची आतषबाजी केली. यावेळी चौधरींवर फुलांची उधळण करण्यात आली.

माजी नगराध्यक्षा रेखा चौधरी यांनी चौधरी यांचे औक्षण केले. यावेळी कृउबाचे माजी सभापती सचिन चौधरी उपस्थित होते. स्वागतानंतर चौधरीं यांनी रेल्वे स्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन केले तसेच परिसरातील दर्गा येथे सुद्धा नमन केले यावेळी रोड शो करीत मतदारांना अभिवादन केले तर ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. मीडियाशी बोलताना चौधरी यांनी पक्षश्रेष्ठी शरद पवार यांनी आशीर्वाद दिल्याचे सांगत उद्या अधिकृत उमेदवारी जाहीर होणार असल्याचे सांगत रावेर लोकसभेत आपलाच विजय होणार असल्याचा दावा केला. गेल्या दहा वर्षात कुठलीही विकासकामे झालेली नाही, मतदारांचा कौल आपल्याला असेल, असेही ते पत्रकार परीषदेत म्हणाले.