भुसावळ – निवडणुकीच्या सर्व कामकाजामध्ये सुलभता व सुसूत्र बद्धता यावी यासाठी रावेर बी सी च्या अंतर्गत भुसावळ उपविभागीय कार्यालयामध्ये कंट्रोल रूम तयार करण्यात आले आहे . येथे आचारसंहिता कक्ष, परवाना कक्ष, मतदार मदत कक्ष ,मतदार जनजागृती कक्ष, संपर्क आराखडा कक्ष ,तक्रार निवारण कक्ष, वाहतूक आराखडा कक्ष प्रसारमाध्यम कक्ष, कायदा सुव्यवस्था कक्ष ,मतदार यादी व्यवस्थापन कक्ष, टपली मतदान कक्ष तसेच नागरिकांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहे .निवडणुकीच्या बाबतीत मतदारांना राजकीय पक्षांना तसेच उमेदवारांना जे काही सहकार्य अपेक्षित आहे ते सर्व एकाच छताखाली उपलब्ध करून दिले असल्याचे प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी सांगितले आहे .तसेच मतदारांना काही अडचण असेल तर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील यांनी नागरिकांना केले आहे.



