अंतर विद्यालय मिनी गोल्फ स्पर्धेत नाहाटा महाविद्यालयाचे वर्चस्व

भुसावळ – अंतर महाविद्यालयीन मिनी गोल्फ स्पर्धा चे आयोजन ताप्ती एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित भुसावल कला विज्ञान आणि पु.ओ.नाहटा वाणिज्य महाविद्यालयात झाले.
या स्पर्धेचा विविध महाविद्यालयाचे 102 पुरुष व महिला यांनी सहभाग घेतला .उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी व्यासपीठावर ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश फालक,सेक्रेटरी विष्णू चौधरी, प्राचार्य डॉ.एस व्ही पाटील उपप्राचार्य डॉबी एच बऱ्हाटे अधिसभा सदस्य क.ब.चौ.उ.म.वि जळगाव प्रा.ई.जी.नेहेते याशिवाय महाविद्यालयातील इतर प्राध्यापक उपस्थित होते
या स्पर्धामध्ये महिला वर्गात
नाहाटा महाविद्यालय प्रथम,
जामनेर महाविद्यालय द्वितीय
आणि मु .जे.महाविद्यालय तृतीय अशी बक्षिसे प्राप्त केली.तर पुरुष वर्गामध्ये
नाहाटा महाविद्यालय प्रथम
एम जे कॉलेज द्वितीय
जामनेर कॉलेज तृतीय अशी बक्षीस मिळाली
याप्रसंगी डॉ. एस एस ब्लोरकर, डॉ. एच डी चौधरी, डॉ जी एस मारतळे, डॉ.अनिता कोल्हे, डॉ. नवनीत आसी , डॉ अमोल पाटील, प्रोफेसर अमर हटकर उपस्थित होते.
डॉ आनंद उपाध्याय,प्रा.साहेबराव राठोड,प्रा.डॉ.संगीता भिरुड,प्रा. डी.एन.पाटील,प्रा डॉ.सचिन येवले,प्रा. प्रशांत पाटील,अख्तर खान आणि श्री श्याम भारंबे यांनी परिश्रम घेतले