भुसावळ –

शैक्षणिक वर्षाच्या (2023-24) 10 वी व 12 वी च्या शालांत परीक्षा सुरु असुन पुढील शैक्षणिक प्रवेश प्रकीयेसाठी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलअर आणि अधिवास प्रमाणपत्र इ. दाखल्यांची गरज भासते. त्यामुळे एप्रिल ते जून महिन्यात दाखल्यांसाठी पाल्यांची व पालकांची तहसिल आणि उपविभागीय कार्यालयात गर्दी होत असते, आगामी काळात होवू घातलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या कामकाजामध्ये सर्व महसूल प्रशासन पूर्ण वेळ व्यस्त होवुन दाखले निर्गमित करण्यास विलंब होवु शकतो व त्यामुळे पाल्यांची व पालकांची गैरसोय होवु शकते याकरिता भुसावळ येथील उपविभागात अंतर्गत असलेल्या भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड येथील नागरिकांनी लवकरात लवकर जवळच्या आपले सरकार सुविधा केंद्राला भेट देवून आवश्यक असलेले दाखले किंवा प्रमाणपत्र त्वरित काढून घ्यावेत असे आवाहन उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी केले आहे .


