भुसावळातील डॉ.वंदना वाघचौरे शाहू, फुले, आंबेडकर पुरस्काराने सन्मानित: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने पुरस्कार वितरण :

भुसावळ – शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार हा महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या सामाजिक न्यायाच्या क्षेत्रातील योगदानामूळे महाराष्ट्राचे नांव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर एक प्रगत सामाजिक सुधारणावादी राज्य म्हणून घेतले जाते. अशा सामाजिक न्याय क्षेत्रातील काम करणाऱ्या संस्थांना हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार सन २००५-२००६ पासून सुरू करण्यात आला असून त्याचे वितरण सामाजिक न्यायदिनी केले जाते. सामाजिक न्यायासाठी अखंडपणे लढणाऱ्या महात्मा जोतीराव फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तीन महापुरुषांचे नाव या पुरस्काराला दिले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने सन २०१९ – २० ते २०२२ – २३ मधील विविध पुरस्कारांचा पुरस्कार वितरण सोहळा दि 12 मार्च 24 रोजी मंगळवारी सकाळी 9 ते 5 या वेळी नॅशनल सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट येथे पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आ. भरत गोगावले, आ. संजय सावकारे, सामाजिक न्याय – विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश – बकोरिया यांच्या उपस्थितीत पार पडला.
अतिशय सन्मानिय असलेला हा पुरस्कार भुसावळ येथील
आर्या फौंडेशनचे अध्यक्ष उमेंन्द्र वाघाचौरे व संचालिका डॉ. वंदना वाघाचौरे या दाम्पत्याला सन2009 सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात वैविध्यपूर्ण असे कार्य केल्याबद्दल यासाठी दिला गेला, या दाम्पत्याने ज्या पद्धतीने जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे अनेक वर्षे नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून जनजागृती करून आज पर्यंत हजारो लोकांना घातक आशा व्यसनांच्या विळख्यातुन बाहेर काढले आहे आणि ते लोक आनंदी आयुष्य जगत आहे,
त्याच पद्धतीने अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजच्या माध्यमातून दिव्यांग आणि निराधार विद्यार्थ्यांना अरुणोदय शिष्यवृत्ती प्रदान करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहेत,
त्याचप्रमाणे हिरकणी महिला मंचच्या माध्यमातून महिलांच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे यासारखे एक नाही तर अनेक समाजोपयोगी उपक्रम आजपर्यंत आर्या फौंडेशनने राबविले आहेत,
त्यासाठी हा प्रतिष्ठित पुरस्कार समाजकल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया ,क्रिडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोड व आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला,
पुरस्काराचे श्रेय -वडील अरुण तायडे, आई सौ लता तायडे ,मित्र व संपूर्ण परिवार तसेच आर्या फौंडेशनच्या संपूर्ण सहकारी टीमला दिले आहे कारण त्याच्या अनमोल सहकार्या शिवाय हे शक्य नव्हते, असे भावोद्गार आर्या फौंडेशनच्या संचालिका डॉ वंदना वाघाचौरे यांनी यावेळी व्यक्त केले .