भुसावळ – शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे दुचाकी हिरो होंडा कंपनीची पॅशन प्रो. मोटरसायकल क्रमांक( एम.एच.१९ डी.एन ४७०४) काळ्या रंगाची मोटरसायकल चोरी झाल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्या अनुषंगाने पोहेकॉ विजय नेरकर हे तपास करीत असतांना गुन्हे शोध पथकाला चोरीच्या एकूण बारा मोटरसायकलवर हस्तगत करण्यास यश आले आहे.

सदर गुन्ह्याचे तपास दरम्यान मिळालेल्या गुप्त बातमीच्या अनुषंगाने संशयित आरोपी शेख बासीद शेख बाबू (वय.२८) राहणार सुलतानपुरा जळगांव जामोद जिल्ह्या बुलढाणा.हल्ली मुक्काम मोहम्मद नगर भुसावळ, मोहम्मद आयज मोहम्मद एजाज ( वय.२५) राहणार सुलतानपुरा जळगांव जामोद जिल्ह्या बुलढाणा.रवींद्र अंबादास घोडसे (वय.४८) राहणार पळसोडा तालुका संग्रामपूर जिल्ह्या बुलढाणा सोनाळा यांना सदर गुन्ह्याचे अनुषंगाने विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा कबुली दिली.तपास दरम्यान सदरचे तिन्ही आरोपीतांना भुसावळ, जळगांव जामोद जिल्हा बुलढाणा ,बऱ्हाणपूर (मध्यप्रदेश) येथून इतर मोटरसायकलवर चोरी केल्याबाबतची कबुली दिल्याने तपासादरम्यान एकूण ४,६५,००० रुपये किंमतीच्या हिरो होंडा,हिरो बजाज कंपनीच्या एकूण १२ मोटरसायकली आरोपीतां कडून विविध ठिकाणी जप्त करण्यात आल्या आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी,अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, डीवायएसपी कृष्णात पिंगळे,यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस निरीक्षक गजानन पडघन,पोउपनिरी.मंगेश जाधव,विजय नेरकर, यासिन पिंजारी,महेश चौधरी, समाधान पाटील,निलेश चौधरी, रमण सुरळकर, उमाकांत पाटील,दिनेश कापडणे, सचिन चौधरी,राहूल वानखेडे,भूषण चौधरी,जावेद शहा, प्रशांत सोनार,योगेश महाजन,प्रशांत परदेशी, योगेश माळी,अमर अढाळे अशांनी मिळून कारवाई केली.सदरील आरोपीतांना न्यायालयात हजर केले असते दोन दिवसांची पोलीस कोठडी सूनविली आहे.सदर गुन्ह्याचा तपास पोहेकॉ विजय नेरकर करीत आहे.


