भुसावळ - वनस्पतीशास्त्र विभाग, भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्त्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र एम.एस्सी.- भाग २ सत्र-४ च्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना कार्यशाळा १२ मार्च रोजी संपन्न झाली. कार्यशाळेच्या उद्घाटनासाठी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.एस.व्ही.पाटील, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्त्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ.मधुकर पाटील होते. प्रमुख पाहुणे प्रा.डॉ.मधुकर पाटील यांनी अभ्यासक्रम पुनर्रचनेबाबत मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत दोन सत्रांमध्ये विविध समिती प्रमुख यांनी कौशल्याआधारित तसेच नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमाचे सादरीकरण केले. कार्यशाळेसाठी समन्वयक म्हणून वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख व प्रा.डॉ.एस.व्ही.पाटील तसेच सचिव म्हणून प्रा.डॉ.सौ.विद्या पाटील यांनी काम पाहिले. सदर कार्यशाळेत नंदुरबार धुळे व जळगाव जिल्ह्यातील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संलग्नित महाविद्यालयातील एकूण 34 प्राध्यापकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. सदर कार्यशाळेत वनस्पतीशास्त्र अभ्यास मंडळाचे सर्व सदस्य तसेच अधिसभा सदस्य प्रा.डॉ. जयवंत मगर आणि प्रा.इ.जी.नेहेते, तसेच उपप्राचार्य प्रा.डॉ.बी.एच.बऱ्हाटे, उपप्राचार्य डॉ.ए.डी.गोस्वामी यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राणीशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.मनोजकुमार जाधव व आभार प्रा.डॉ. विद्या पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक कामिनी सपकाळे, प्रा.उत्कर्षां पाटील, प्रा. हर्षा धांडे, प्रा.ज्योती जंगले, प्रा.स्वप्निल शहा, प्रा.रोहिणी पालवे, प्रा.धर्मेश बोरीकर, प्रा.वसिम शेख, प्रा. पौर्णिमा भारंबे, प्रा.अर्चना तळेले, श्री.संदीप पाटील तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.