भुसावळ – येथील बडोदा बँकेचे खातेदार प्रमोद जगन्नाथ पाटील यांच्या खात्यात मध्ये तळवेल , चादुर बाजार अमरावती येथील विक्रम बाळकृष्ण वैरागडे यांच्या नजर चुकीने प्रमोद पाटील यांच्या खात्यात 44,587 रुपये ऑन लाईन व्यवहार केल्याने जमा झाले .व्यवहार झाल्यावर ज्या व्यापारीला पैसे द्यायचे होते ते त्यांना मिळाले नाही त्यांचा जेव्हा फोन आला की मला पैसे मिळाले नाही तेव्हा विक्रम वैरागडे यांनी ऑन लाईन केलेला व्यवहार चेक केले असता त्यांच्या लक्षात आले की आपल्या हातून मोठी चुक झाली आहे .त्यांनी तात्काळ प्रमोद पाटील यांना संपर्क करून प्रमोद पाटील यांना झालेली सर्व घटना सांगितली. सर्व हकिकत ऐकल्यावर प्रमोद पाटील यांनी विक्रम वैरागडे यांना धीर देत सांगितले की तुमचे पैसे जर माझ्या खात्यात आले असतील तर तुम्हाला नक्की मिळतील व त्यांनी सांगितल्या प्रमाणे बॅक मॅनेजर यांच्या सल्ल्याने विक्रम वैरागडे यांना पूर्ण रक्कम 44,587 रुपये परत केले .वैरागडे यांनी त्यांचे आभार मानले .व त्यांनी बोलून दाखविले आजच्या युगात आपल्या सारखे प्रामाणिक व्यक्ती आहेत व म्हणूनच आज माझ्या सारख्या गरीब शेतकऱ्याच्या खात्यात पैसे परत देवून प्रमोद पाटील यांनी माणुसकी दाखवली मी खरच प्रमोदजी पाटील यांचे आभार मानावेत तितके कमीच असल्याचे सांगितले .

नजर चुकीने आलेले शेतकऱ्याच कष्टाचे पैसे परत करणे हे माझे आद्य कर्तव्यच होते व आहे या शेतकरी बांधवास पैसे त्वरित मिळाले याचे मनस्वी समाधान मिळत असल्याच्या भावना प्रमोद पाटील यांनी व्यक्त केल्या आहे .


