,

भुसावळ : वरणगाव शहरात बांधकाम कामगारांना संसार उपयोगी भांडे सहा.पोलीस निरीक्षक भरत चौधरी, माजी नगराध्यक्ष सुनील काळे, उपनराध्यक्ष शेख अखलाक, मिलिंद भैसे, शामराव धनगर, सुभाष माळी, रमेश पालवे, रुख्मिणी काळे, प्रणिता पाटील-चौधरी, कल्पना जैन यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी वरणगाव शहरात बांधकाम कामगारांची संघटना स्थापन करण्यात आली
योजनांचा लाभ मिळवून देणार
माजी नगराध्यक्ष सुनील काळे म्हणाले की, पाचशे कामकारांची नोंदणी करण्यात आली असून कामगारांना स्वरक्षणासाठी पेटी देण्यात येत आहे. आगामी काळत्तत 36 प्रकारच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्यकाळात जात-धर्म न पाहता सर्वांना विविध योजनेचा लाभ दिला त्या प्रमाणे सर्व जाती-धर्माच्या लोकांनी 2024 मध्ये नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी भाजपाच्या पाठीमागे उभे रहावे, असे आवाहन त्यांनी केले.


