प्रोजेक्ट रीपोर्टसाठी दहा हजारांची लाच : जळगावातील खाजगी पंटर धुळे एसीबीच्या जाळ्यात –

जळगाव : डीआयसीकडे (जिल्हा उद्योग केंद्र) प्रोजेक्ट रीपोर्ट सादर करण्याच्या मोबदल्यात दहा हजारांची लाच मागून तीन स्वीकारताना जळगावातील खाजगी महिलेस धुळे एसीबीने अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईने जळगावात खळबळ उडाली.

हा सापळा धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे व सहकार्‍यांनी यशस्वी केला.