जळगाव : अल्पवयीन चुलत बहिणीवरच नराधम भावाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना शहरात घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
जळगावात 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. मुलीसोबत काकांचा मुलगादेखील वास्तव्यास आहे. आठव्या इयत्तेत शिक्षण घेणार्या पीडीतेवर नात्याने चुलत भाऊ लागणार्यार नराधमाने अत्याचार केला. ही घटना 25 फेब्रवुारीच्या चार महिन्यांपूर्वीपासून सुरू होती. अल्पवयीन मुलीला मारहाण देखील करीत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. शनिपेठ पोलिसात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधम आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर करीत आहे.



