रावेर : शहरातील आठवडे बाजार परीसरातून दुचाकी चोरी केल्या प्रकरणी चोरट्याला अटक करण्यात रावेर पोलिसांना यश आले. चोरट्याकडून ोन दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या. सायला मानसिंग बारेला (18, खार्या काकोडा, ता.झिरण्या, जि.खरगोन, मध्यप्रदेश, ह.मु.गिट्टी मशीन खदान, उटखेडा रोड, ता.रावेर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
रावेरच्या आठवडे बाजार परिसरातून दुचाकी चोरी झाल्यानंतर चोरट्याबाबत पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांना गुप्त माहिती मिळाली व त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडील दुचाकी चोरीची निघाली. सायला मानसिंग बारेला याच्याकडील हिरो स्प्लेंडर दुचाकी (क्रमांक एम.एच.19 ई.डी. 5275) तर दुसरी बजाज कंपनीची सीटी 100 काळया रंगाची दुचाकी जप्त करण्यात आली.
रावेरचे पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हवालदार श्वर्र चव्हाण, पोलीस नाईक किशोर सपकाळे, कॉन्स्टेबल सचिन घुगे, कॉन्स्टेबल प्रमोद पाटील, विशाल पाटील, महेश मोगरे, अमोल जाधव, विकार शेख, तथागत सपकाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.



