मुक्ताईनगर : शिवसेनेच्या महिला आघाडीच्या माध्यमातून केलेल्या कामाची दखल म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, उपसभापती निलम गोरे, आमदार मनिषा कायदे यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर लोकसभा संपर्क प्रमुखपदी संजना चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

पक्षाने दिलेली जबाबदारी व केलेल्या छोट्याशा कामाचा हा खूप मोठा सन्मान असून याची पावती आपण कामातून देणार आहोत शिवाय पक्ष संघटन व पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे संजना पाटील म्हणाल्या. शासनाने केलेल्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी वचनबद्ध आहे तसेच आदिशक्ती श्री संत मुक्ताई साहेबांच्या आशीर्वादाने मोठी जबाबदारी आलेली असून महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत विविध योजना तळागाळातील माता -भगिनीपर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान या निवडीबद्दल आमदार चंद्रकांत पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख समाधान महाजन, युवा सेना जिल्हा प्रमुख पंकज राणे, मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, तालुकाप्रमुख छोटू भोई आदींनी अभिनंदन केले आहे.


