भुसावळ
भुसावळ येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विद्यालय सेवा केंद्र भुसावळ तर्फे आयोजित महाशिवरात्रि निमित्त
शहरातील श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात मानव जीवन दिव्यीकरण आध्यात्मिक प्रदर्शन व सबका मालिक एक या जिवंत नाटिकेचे ही प्रस्तुतीकरण करण्यात आले . या कार्यक्रमाचे उद्घाटन शहरातील प्रसिद्ध डॉक्टर सौ मधु मानवतकर व श्री मानवतकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले . यावेळी जीवनात आध्यात्मचे महत्व खूप मोठे आहे . परमेश्वर एकच असून सर्वांनी या विचाराने वागले तर सर्वामध्ये प्रेम शांती राहील असे मत डॉ सौं मधु मानवतकर यांनी उद्घाटन प्रसंगी म्हटले . यावेळी सेवाचंद्राच्या प्रमुख संचालिका सिंधू दीदी यांनी महाशिवरात्रीचे महत्त्व सांगून सर्वात्मोके पिता एक आहे आपण इतर देवदेवतांना फुले चढून येतो मात्र या दिवशी महादेवाच्या पिंडावर धोत्र्याचे फुल काट्याचे फळ आधी वस्तू चढवल्या जातात याचा अर्थ परमेश्वर ला आपल्यातल्या असलेले वाईट गुण परमेश्वराला अर्पण करून एका नव्या सृष्टीकडे जाण्यासाठी महाशिवरात्रीचे महत्त्व समजून घेणे महत्त्वाचे आहे असे त्यांनी सांगितले त्यात स्वत:चा वास्तविक परिचय, परमात्म्याची दिव्य कर्तव्य, सृष्टीचक्राचे रहस्य, मृत्यूनंतर काय? मृत्यूपूर्वी काय या सारख्या विविध आध्यात्मिक रहस्य स्पष्ट करण्यात आलीत. ब्र.कु ज्योती दिदी कविता दिदींनी राजयोगाची विधी आणि अनुभूतीही करविली.
सबका मालिक नाटिकेत रुखमा दिदी यांनी सर्व धर्मा चे प्रमुख ही महादेव अर्थात निराकार परमेश्वराला मानतात नाटिकेच्या माध्यमातून दाखविले . नागरीकांना राजयोगाच्या अभ्यास स्थानिक शाखेत विनामुल्य मिळणार असल्याचे आवाहनही बी के सिंधू दिदी यांनी यावेळी केले.
या प्रदर्शनाचा लाभ हजारो नागरिकांनी घेतला यावेळी अनिल भाई शिंदे नाना पाटील सर दिलीप महाजन नितीन चौधरी भरत भाई गोपाल भाई मनोज भाई रितेश भाई प्रभाकर भाई तेसेच सेवा केंद्राच्या भाई बहन यांनी प्रदर्शनी यशस्वी साठी सहकार्य केले





