मध्य रेल्वे प्रवाशी सुविधेसाठी अमरावती ते पुणे जंक्शन दरम्यान द्वि साप्ताहिक रेल्वे सेवा सुरू करीत आहे.
तपशील खालीलप्रमाणे:-
ट्रेन क्रमांक ११४०६ अमरावती – पुणे जंक्शन द्वि साप्ताहिक एक्सप्रेस दि.
०९.०३.२०२४ पासून दर सोमवारी आणि शनिवारी अमरावती येथून १९.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १६.२० वाजता पुणे जंक्शन येथे पोहोचेल.
ट्रेन क्रमांक ११४०५ पुणे – अमरावती द्वि साप्ताहिक एक्सप्रेस दि.
१०.०३.२०२४ पासून दर शुक्रवारी आणि रविवारी पुणे येथून २२.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १७.३० वाजता अमरावती येथे पोहोचेल.
थांबे – बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, वाशीम, हिंगोली डेक्कन, बसमत, पूर्णा, परभणी, परळी वैजनाथ, लातूर रॊड, लातूर, उस्मानाबाद, बारशी टाउन, कुर्डुवाडी, जेऊर, जिंती रोड, दौंड, केडगाव आणि उरळी
तपशीलवार वेळ आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in संकेतस्थळाला भेट द्या किंवा एनटीईएस (NTES) अॅप डाउनलोड करा.



