भुसावळ -भुसावळ येथील मध्य रेल्वेच्या डिव्हिजनल ऑपरेटिंग मॅनेजर योगेश पाटील यांची सोलापूर विभागात वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक या पदावर प्रमोशन झाल्याबद्दल पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे नाना पाटील सर व पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे जिल्हा सचिव व पर्यावरण विशेष प्रेम करणारे रेल्वे कर्मचारी संदीप पाटील यांनी योगेश पाटील यांचे प्रमोशन झाल्याबद्दल वृक्षाचे रोप देऊन त्यांच्या सत्कार केला .
मध्य रेल्वे सोलापूर विभागाच्या वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापकपदी योगेश पाटील यांनी पदभार स्वीकारला. दरम्यान, योगेश पाटील हे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०१५ च्या परीक्षा बॅचचे इंडियन रेल्वे ट्रैफिक सर्व्हिस ( आई आर टी एस) अधिकारी आहेत. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाच्या वरिष्ठ वाणिज्य विभागीय व्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात सहाय्यक परिचालन व्यवस्थापक आणि मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात, विभागीय परिचालन व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. योगेश पाटील यांनी सोलापूर विभागाचे मावळते वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक एल. के. रणयेवले यांचा त्यांनी प्रशासकीय पदभार स्वीकारला आहे . अंत्यत सामान्य परिस्थिती असतांना स्पर्धा परिक्षेचा जिद्द आणि चिकाटीने अभ्यास करत योगेश पाटील यांनी पदवीचे शिक्षण कवियत्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातुन आणि पदव्युत्तर शिक्षण हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून संगणकीय शास्त्र या शाखेतून पूर्ण केले. योगेश पाटील यांना २०२१-२२ यावर्षी मध्य रेल्वेच्या महाप्रबंधक पुरस्काराने सम्मानित केले. योगेश पाटील यांनी आपली सात वर्ष अधिकारी म्हणून सेवा बजावली आहे. येणाऱ्या काळात याच दीर्घ अनुभवाचा सोलापूर विभागाला नक्कीच फायदा होईल. त्यांना पर्यावरण जागर प्रतिष्ठान , शैक्षिक आगाज तर्फे अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या



