सिंधी समाजबांधवांच्या चेट्रीचंड उत्सवाला सार्वजनिक सुटी द्या : भुसावळात मुख्यमंत्र्यांना साकडे –

भुसावळ : सिंधी समाजबांधवांचे नववर्ष चेट्रीचंड्र महोत्सव यंदा 10 एप्रिल रोजी साजरा होणार आहे. या निमित्ताने सार्वजनिक सुटी जाहिर करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीचे शहराध्यक्ष जीतू माखीजा यांनी केली आहे. दरवर्षी गुढीपाडवा व चेट्रीचंड्र उत्सव एकाच दिवशी येत असल्याने यामुळे सुटी असते.

यंदा मात्र गुढी पाडव्याच्या दुसर्‍या दिवशी उत्सव साजरा होणार आहे. यामुळे चेट्रीचंड्र उत्सवाला स्वतंत्ररीत्या सुटी द्यावी. अनेक राज्यांनी सार्वजनिक सुटी जाहिर करावी, मागणी जितू माखीजा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.